Zilla Parishad Primary School constructed by Volkswagen India receives Gold certification for National Excellence by the Indian Green Building Council

Zilla Parishad Primary School constructed by Volkswagen India receives Gold certification for National Excellence by the Indian Green Building Council
Zilla Parishad Primary School constructed by Volkswagen India receives Gold certification for National Excellence by the Indian Green Building Council
Zilla Parishad Primary School constructed by Volkswagen India receives Gold certification for National Excellence by the Indian Green Building Council

फोक्सवॅगन इंडियाकडून बांधण्यात आलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलकडून राष्ट्रीय सर्वोत्तमतेसाठी सुवर्ण प्रमाणपत्र प्रदान

 

  • शालेय इमारतीचे उद्घाटन जागतिक पर्यावरण दिनी म्हणजे ५ जून २०१८ रोजी करण्‍यात आले
  • मुलभूत प्राथमिक शिक्षण देण्याबरोबरच या अभ्यासक्रमातून मुलांमध्ये नैसर्गिक स्त्रोतांचा आदर  आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता वाढवण्यावरही भर दिला जातो

 

पुणे, २२ ऑगस्ट २०१९- फोक्सवॅगन इंडियाच्या फडके वस्ती, निघोजे, पुणे येथील प्राथमिक शाळेला भारतीय हरित इमारत परिषदेकडून सुवर्ण प्रमाणपत्र देण्यात आले. या इमारतीचे उद्घाटन २०१८ च्या जागतिक पर्यावरण दिनी करण्यात आले आणि मागील वर्षभराच्या कालावधीत या शाळेने विविध प्रकारचे सहभाग उपक्रम शाळेत आयोजित केले आहेत. त्यात पर्यावरण स्नेही उपक्रमांचा समावेश असलेले सण साजरे करणे, रिसायकल, पुनर्वापर आणि शाश्वतता या गोष्टी मुलांना शिकवताना ग्रीन क्लब आयोजित करणे अशा गोष्टींचा समावेश आहे. या शाळेचे बांधकाम फोक्सवॅगन इंडियाकडून सरकारच्या कौशल्य विकास उपक्रमात योगदान म्हणून करण्यात आले होते. या शाळेच्या इमारतीत १२० विद्यार्थ्यांना सामावून घेण्याची क्षमता आहे.

भारतीय हरित इमारत परिषदेचे उद्दिष्ट शाश्वत वातावरणाच्या बांधकामाला मार्गदर्शन आणि प्रमाणित करण्‍याचे आहे, जेणेकरून नैसर्गिक स्त्रोतांचा पुरेपूर वापर करता येईल, ऊर्जाबचत होईल, रिसायकल साहित्याचा वापर होऊन कचरा कमीत-कमी होईल. शाळेचे मूल्यमापन आठ निकषांवर करण्यात आले. त्यात साइटची निवड आणि नियोजन, ऊर्जा संवर्धन आणि वापर, शाश्वत जल पद्धती आणि अंतर्गत पर्यावरण दर्जा यांचा समावेश आहे. भारतीय हरित इमारत परिषदेने शाळेला ११० पैकी ८६ गुण मिळाल्यावर सुवर्ण प्रमाणपत्र प्रदान केले आहे. 

फोक्सवॅगन इंडियाने बांधकाम प्रक्रियेत विविध उपक्रम हाती घेतले होते. त्यात वास्तुरचना डिझाइन, सिव्हिल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रिकल, प्लंबिंग, लँडस्केपिंग आणि इंटिरियर डिझायनिंगचा समावेश होता. त्याचे व्यवस्थापन कंपनीच्या प्लान्ट इंजिनीअरिंग विभागात अंतर्गत तज्ञांनी केले.

हे प्रमाणपत्र प्राप्त केल्याबाबत श्री. गुरूप्रताप बोपराई, व्यवस्थापकीय संचालक, फोक्सवॅगन इंडिया म्हणाले की, ''शिक्षण हा वाढीचा एक महत्वाचा घटक आहे आणि योग्य साधनसुविधा असल्यामुळे मुलाच्या विकासाच्या सुरूवातीच्या टप्प्यात एक वेगळेपण निर्माण होते. आम्ही बांधलेल्या शाळेला भारतीय हरित इमारत परिषदेकडून राष्ट्रीय सर्वोत्तमतेसाठी सुवर्ण प्रमाणपत्र मिळाल्याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटत आहे. मागील वर्षभराच्या कालावधीत आम्ही विविध समुदायांसोबत काम करून दीर्घकालीन स्थितीत वाढ आणि विकास देण्यासाठी शाश्वत पर्यावरण कशा पद्धतीने निर्माण करता येईल यासाठी प्रयत्न केला. फोक्सवॅगन इंडिया विविध सामाजिक उपक्रमांद्वारे या समाजांच्या विकासात कार्यक्षमतेने योगदान देत आहे.''   

फोक्सवॅगन ग्रुप इंडिया बाबतः फोक्सवॅगन ग्रुपचे प्रतिनिधित्व भारतातील पाच पॅसेंजर कार ब्रँडद्वारे केले जातेः ऑडी, लॅम्बॉर्गिनी, पोर्शे, स्कोडा आणि फोक्सवॅगन. फोक्सवॅगन समूहाचे भारतात मागील १८ वर्षांपासून अस्तित्व आहे आणि त्यांनी २००१ साली स्कोडा ब्रँडच्या प्रवेशाद्वारे भारतातील प्रवास सुरू केला आहे. ऑडी हा ब्रँड आणि फोक्सवॅगन ब्रँडचा भारतात २००७ साली प्रवेश झाला आणि पोर्शे आणि लॅम्बॉर्गिनी ब्रँड २०१२ साली आले. प्रत्येक ब्रँडचे स्वतःचे वैशिष्टय आहे आणि ते बाजारात स्वतंत्ररित्या कार्यरत आहेत. फोक्सवॅगन ग्रुप इंडियाकडे ३० मॉडेल्स असून त्यात २४० डीलरशिप्स आहेत आणि ते दोन कारखाने चालवतात- पुणे आणि औरंगाबाद. पुणे कारखान्यात २००,००० कार प्रतिवर्ष एवढी क्षमता आहे (तीन पाळ्यांच्या यंत्रणेत कमाल) आणि त्यांच्याकडून सध्या फोक्सवॅगन पोलो, एमिओ आणि व्हेंटो आणि स्कोडा रॅपिड बनवल्या जातात. औरंगाबाद येथील कारखान्यात ऑडी, स्कोडा आणि फोक्सवॅगन या भारतात विकल्या जाणाऱ्या गाड्यांचे भाग बनवले जातात आणि त्यांची कमाल वार्षिक क्षमता सुमारे ८९,००० एवढी आहे. फोक्सवॅगन ग्रुप इंडिया हा फोक्सवॅगन एजीचा भाग आहे आणि त्याचे जागतिक पातळीवर १२ ब्रँड्सकडून प्रतिनिधित्व केले जाते- ऑडी, बेंटली, बुगाटी, डुकाटी, लॅम्बॉर्गिनी, पोर्शे, स्कॅनिया, सीट, स्कोडा, फोक्सवॅगन कमर्शियल व्हेइकल्स, मॅन आणि फोक्सवॅगन पॅसेंजर कार्स.

प्रसारमाध्यम संपर्क

फोक्सवॅगन ग्रुप इंडिया कम्युनिकेशन्स            

शिवानी सिन्‍हा

+91- 9620388586

alexander.skibbe@volkswagen.co.inshivani.sinha@volkswagen.co.in

 

परफेक्ट रिलेशन्स प्रायव्‍हेट लिमिटेड कम्‍युनिकेशन्‍स:

रिचा शाह

फोन: +91 7506426992

richa.shah@perfectrelations.com

 

मेघल जुठानी

फोन: +91 8080288031

meghal.juthani@perfectrelations.com

 

अधिक माहिती

www.volkswagen-media-services.in

कृपया या पोर्टलवर नोंदणी करा आणि अद्ययावत प्रेस रिलीज व उच्‍च रेझोल्युशन छायाचित्रे आणि व्हिडिओ पाहा.